*** कोकणी माणूस ***
--------------------
(मालवणी बोलीभाषेतील कविता)
माशाच्या कालवणाक भाताची जोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
ओसरीवर बसान इलो गेलो बघता,
आवाज देऊन छान वायच बस म्हणता !
पोरा-बाळांची इचारपूस कराता,
मन त्येचा साफ, सगळा बोलान टाकता !
पानाच्या डब्यात सुपारीची फोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
कोंबड्याच्या बांगेन दिस तेचो उजाडता,
बैलांच्या वांगडा रोज शेतात राबता !
गाय म्हैस गोठ्यात, घरचा दूध-दूभता,
कुत्रो मांजर पोपट यांच्या घरात रव्हता !
देवळातला भजन कानाक लागता गोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
दारातल्या झाडाक फणस लटाकता,
कोकमाचा सरबत आंबटगोड लागता !
काजूगर काढताना मेहनत लय होता,
बोरा-करवंदा खाऊन जीव लय रमता !
शहाळ्याचा पाणी आणि खोबरा लागता गोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
--------------------
(मालवणी बोलीभाषेतील कविता)
माशाच्या कालवणाक भाताची जोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
ओसरीवर बसान इलो गेलो बघता,
आवाज देऊन छान वायच बस म्हणता !
पोरा-बाळांची इचारपूस कराता,
मन त्येचा साफ, सगळा बोलान टाकता !
पानाच्या डब्यात सुपारीची फोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
कोंबड्याच्या बांगेन दिस तेचो उजाडता,
बैलांच्या वांगडा रोज शेतात राबता !
गाय म्हैस गोठ्यात, घरचा दूध-दूभता,
कुत्रो मांजर पोपट यांच्या घरात रव्हता !
देवळातला भजन कानाक लागता गोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
दारातल्या झाडाक फणस लटाकता,
कोकमाचा सरबत आंबटगोड लागता !
काजूगर काढताना मेहनत लय होता,
बोरा-करवंदा खाऊन जीव लय रमता !
शहाळ्याचा पाणी आणि खोबरा लागता गोड,
कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड !!
